शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या नेत्याची खासदारकी रद्द, सचिवालयाने घेतला निर्णय

दिल्ली:  लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार मोहम्मद फैजल यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. फैजल याचं ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयानं दिली.

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात खासदाराला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना 2009 सालची आहे. बुधवारी कावरट्टी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे खासदार आणि अन्य आरोपींच्या जामीनालाही स्थगिती दिली. त्यानंतर तेथून त्यांना केरळमधील कन्नूर सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले.मात्र, फैजल यांनी या शिक्षेविरोधात केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचवेळी न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.




काय आहे प्रकरण?

फिर्यादीनुसार, खासदाराने कथितपणे लोकांच्या गटाचे नेतृत्व केले आणि वादानंतर माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई मोहम्मद सलिया यांना गंभीर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फैजल आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.काँग्रेस नेते मोहम्मद सलिया यांना नंतर केरळला नेण्यात आले आणि त्यांच्यावर अनेक महिने खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या खटल्यात एकूण 32 आरोपी होते आणि पहिल्या चार जणांना शिक्षा झाली होती.खासदार हे या प्रकरणातील दुसरे आरोपी होते. मात्र, ही किरकोळ बाचाबाची असल्याचे आरोपींच्या वकिलांनी ठामपणे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने