'आम्ही घर कोंबडे नाहीत…'; पुण्यात विद्यार्थ्यी आंदोलनात भाजप आमदाराचं वक्तव्य

पुणे : एमपीएसी परीक्षा पध्दतीत करण्यात आलेले बदल हे २०२५ पासून लागू करा यासाठी पुण्यातील अल्का टॉकिज चौकात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज अराजकीय "साष्टांग दंडवत" आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार हे देखील सहभागी झाले असून निर्णय होत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही असा इशार गोपीचंद पडळकरांनी सरकारला दिला आहे.राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान या अराजकीय साष्टांग दंडवत या आंदोलनात भाजपचे आमदार उपस्थितीत आहेत.दरम्यान राज्य सरकारमध्ये असून देखील तुम्ही आंदोलनात सहभागी होत आहात यामागचं कारण विचारले असता पडळकर म्हणाले की, जरी आम्ही सरकारमधले लोकप्रतिनीधी असालो तरी आम्ही लोकांमधील आहोत. आम्ही घरकोंबडे नाहीयेत. असा टोला गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.विरोधात असताना देखील आम्ही जीथे अडचण असेलत तेथे पोहचायचो. सरकार येऊन सहा महिने झालं. आठ-दहा दिवसापूर्वी यांनी आंदोलन केलं, पण यांचा प्रश्न मिटला नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर निर्णय होत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही असेही गोपीचंद पडळकर म्हणालेत.पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, काल मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थ्यांच्याबाबतीत सकारात्मक निर्णय घ्या अशी विनंती केली, जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर आम्ही विद्यार्थ्यांची साथ सोडणार नाही असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे पडळकर यांनी सांगितले.

आम्ही ज्या विषयात हात घालतो तिथ यश घेऊनच जातो असे पडळकर म्हणाले.विद्यार्थ्यांची मागणी पहिल्या दिवसांपासून रास्त असल्याचे अभिमन्यु पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की चंद्रकांत दळवी समितीची स्थापना काँग्रेसच्या काळात झाली त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच नाही.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्ष पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. तसेच हे बदल २०२३ पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून २०२३ ऐवजी २०२५पासून हे बदल लागू करण्याची राज्यभरातील उमेदवारांची मागणी आहे. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसतर्फे दोनवेळा आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पुण्यात विद्यार्थी आज पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने