वाद झाला, टीका झाली आता होतोय कौतुकाचा वर्षाव! ही आहे 'पठाण'ची खास बात..

मुंबई:  गेल्या एक महिन्यापासून शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठाण' चित्रपटाला घेऊन इतका वाद झाला आहे की अजूनही त्या वादावर चर्चा होत आहे. पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्यांवरून आणि दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाची बिकनीवरून अनेकजन चित्रपट बॉयकॉटची मागणी करत होते. पण आज पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला काही मिनिटांतच लाखोंचे लाईक्स मिळले आणि या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



शाहरुख खान चार वर्षांनंतर पठाण चित्रपटातुन कमबॅक करत आहे.तो शेवटचा 'झिरो' चित्रपटात दिसला होता. शाहरुखने त्यांच्या वाढदिवशी पठाण चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते चाहत्यांनी खुप कौतुक केले त्यांनतर दोन गाणी रिलीज केली. आज अखेर प्रतिक्षा संपली आज पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला चार भाषेत हा ट्रेलर रिलीज झाला आणि चाहत्यांनी लाईक्स तर केले आहे आणि शाहरुखच कौतुक करताना थकत नाही आहे. पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग'गाण्यावरून जितका वाद झाला त्याहून जास्त कौतुक चित्रपटाच्या ट्रेलरचे होत आहे.

खरं सांगायचं झालं तर एकिकडे पठाण चित्रपट बॉयकॉटची मागणी करत आहेत पण आज पठाण चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यापासून एकही चित्रपट बॉयकॉटची कमेंट्स नाही आहे जो तो बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानच जबरदस्त कौतुक करताना दिसत आहे." तुम्ही बॉलीवूड बॉयकॉट करू शकता पण शाहरूख खानला नाही" " पठाण चित्रपट बॉलिवूडला आता पूढे आणेल" "पठाण चित्रपट आणि शाहरुखने हिंदूस्तानाचे दिल जिंकली आहेत " " बॉयकॉट नाहीतर नंबर वन आहे पठाण " इतकेच नव्हेतर शाहरूखचा या चित्रपटातील डॉयलॉग वर चाहत्यांच्या अंगावर शहारे आणले आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा बरोबर जॉन अब्राहम देखील या चित्रपटात आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने