धीरेंद्र शास्त्रीने लग्नाविषयी केला होता मोठा खुलासा, वाचा त्याच्या वैयक्तीक आयुष्याविषयी...

मुंबई: बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज सध्या चांगलेच चर्चेत आहे. अनिंसने त्यांना आव्हान दिले होते की त्यांची सिद्धी किंवा चमत्कार दाखवला तर त्यांना ३० लाख रुपये देण्यात येईल. यावरुन अनिंस आणि धीरेंद्र महाराजमध्ये चांगलाच वाद रंगला पण तुम्हाला माहिती आहे का स्वत:जवळ सिद्धी असल्याचा दावा करणारे धीरेंद्र महाराज फक्त २६ वर्षाचे आहे. त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी एक मोठा खुलासा केला होता आज आपण त्याविषयी आणि त्यांच्या वैयक्तीक आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत.

धीरेंद्र शास्त्री
4 जुलै 1996 ला छतरपुर जिल्ह्यात झाला. त्यांच्या कुटूंबात आईवडिल दोन भाऊ आणि एक बहिण आहे. त्यांची आई त्यांना प्रेमाने धीरू नावाने हाक मारते. त्यांचं शिक्षण बी.ए पर्यंत झालंय. त्यांचं बालपण खूप गरीबीत गेलं. त्यांची आई दूध विकायची तर वडिल सत्यनारायणची कथा वाचायचे.धीरेंद्र महाराजने लग्नाविषयी केला होता मोठा खुलासा

एका मुलाखतीत धीरेंद्र महाराजच्या आईने त्यांच्या लग्नाविषयी आपण उत्सूक असल्याचं सांगितलं होतं पण धीरेंद्र महाराजने आधीच आपल्या आईला सांगून ठेवले आहे की त्यांच्या लग्नाविषयी जास्त विचार करू नये. कारण ते लग्न करणार नाही.धीरेंद्र महाराज यांनी स्वत: सांगितले की आई अनेक मुली बघितल्या पण अद्याप असं काही जुळून आलं नाही.

प्रसिद्ध कृष्णकथाकार जया किशोरी आणि बागेश्वर महाराज लग्न करणार का?

बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज आणि जया किशोरी हे लग्न करणार असल्याचं बोलले जाते. याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती मात्र यावर धीरेंद्र शास्त्रींनी हे वृत्त फेटाळून लावले होते. एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे सगळं खोटं असल्याचं नमूद केलं होतं तर जया किशोरी यांनी सुद्धा फेसबुक पोस्ट करत या सर्व अफवा असल्याचं म्हटलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने