ब्लॅक बॉक्स सापडला; भीषण विमान अपघातातचं रहस्य येणार समोर

नेपाळ:  नेपाळमधील पोखरा येथे रविवारी झालेल्या विमान अपघातातील ७२ प्रवाशांपैकी ६८ जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.अद्याप चार जणांच्या मृतदेहांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शोधकार्यादरम्यान कर्मचाऱ्यांना अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडण्यात यश आले आहे, अशी माहिती विमानतळ अधिकारी शेर बाथ ठाकूर यांनी दिली आहे.ब्लॅक बॉक्स सापडल्याने नेमका हा अपघात कसा झाला, वैमानिक आणि एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांमधील शेवटचं संभाषण काय होतं? हे यामुळे समोर येण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे, विमान अपघाताबाबत नेपाळमध्ये आज राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.चार जणांचा शोध सुरू

अपघातग्रस्त विमानात ६८ प्रवाशांसह चार क्रू मेंबर होते. यातील ६८ जणांचे मृतदेह शोधण्यास अधिकाऱ्यांना यश आले असून, अद्याप चाप प्रवाशांचा शोध लागलेला नाही.या अपघातात पाच भारतीय नागरिकांचाही समावेश असून, या सर्वांची ओळख पटवण्यात आली आहे. अभिषेक कुशवाह (२५), विशाल शर्मा (२२), अनिल कुमार राजभर (२७), सोनू जैस्वाल (३५) आणि संजय जयस्वाल अशी पाच भारतीयांची नावे आहेत, हे सर्व सर्व उत्तर प्रदेशातील रहिवासी होते.

पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्र्यांकडून शोक व्यक्त

नेपाळमध्ये घडलेल्या भीषण अपघातानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे."नेपाळमधील विमान अपघातामुळे अत्यंत दु:ख झाले आहे. यात भारतीय नागरिकांसह अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या भावना त्यांच्या कुटुंबियांसमवेश असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने