पंजाब सरकारची पहिली विकेट पडली; कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा, कारण...

 चंदीगढ:  पंजाबचे कॅबिनेट मंत्री फौजा सिंह सरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी फौजा सिंग यांच्यावर भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप होता. तसेच त्यांची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. ज्यामध्ये ते आपल्या ओएसडीसोबत भ्रष्टाचारातून कमाई करण्याबद्दल बोलत होते.पंजाबचे कॅबिनेट मंत्री फौजा सिंह यांनी वैयक्तिक कारणं देत राजीनामा दिला. मी पक्षाचा निष्ठावान सैनिक असून कायम एक सैनिक म्हणून राहिलं, असंही ते म्हणाले. फौजा सिंग सरी यांचा हा ऑडिओ सप्टेंबरमध्ये व्हायरल झाला होता, त्यानंतर आम आदमी पार्टीने त्यांना दोन कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या.या राजीनाम्यानंतर पंजाबच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक मंत्र्यांची खातीही बदलली जाऊ शकतात. त्याचबरोबर नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, असे सांगितले जात आहे. आज संध्याकाळी राज्यपालांच्या निवासस्थानी साध्या समारंभात नव्या चेहऱ्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने