"जनता काय समजायचं ते समजली"; रघुराम राजन यांच्या कौतुकानंतर भाजपा नेत्याचा टोला

दिल्ली: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला हजेरी लावल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राहुल गांधी पप्पू नाही, असं विधान राजन यांनी केलं आहे. त्यावरुन आता भाजपा नेत्याने त्यांना टोला लगावला आहे.भाजपा आमदार अतुल भातखळकर आपल्या ट्वीट्सच्या माध्यमातून सातत्याने विरोधकांवर टीका करत असतात. त्यांनी रघुराम राजन यांच्या याच विधानाचा समाचार घेतला आहे.आपल्या ट्वीटमध्ये भातखळकर म्हणतात, "राहुल गांधी पप्पू नाही हे प्रमाणपत्र रघुराम राजन यांना द्यावे लागते यातच काय ते कळते. अजून चार साक्षीदार उभे करा पण जनता काय समजायचं ते समजून चुकली आहे."काय म्हणाले होते रघुराम राजन?

"राहुल गांधींची पप्पू ही प्रतिमा खूपच दुर्दैवी आहे. त्यांच्याशी अनेक आघाड्यांवर संवाद साधण्यात मी जवळपास एक दशक घालवलं आहे. ते कोणत्याही अर्थानं मला पप्पू वाटत नाहीत.राहुल एक हुशार, तरुण  जिज्ञासू व्यक्ती आहे." राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर त्या दरम्यान रघुराम राजन यांनी हे विधान केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने