वाह रे विक्रम.. वेड ची ८० कोटी कडे रेकॉर्डतोड घोडदौड...

मुंबई:  बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबरला रिलीज झाला. रितेशचा दिग्दर्शक म्हणून तर जिनिलियाचा अभिनेत्री म्हणून मराठीतला हा पहिलाच सिनेमा आहे. रितेश व जिनिलीयाच्या 'वेड' बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. वेडने रेकॉर्डतोड कमाई करत सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.वेड आता थेट ८० कोटींच्या घरात जाणार आहे. वेडने आजवर ७० कोटींची कमाई केली आहे. वेडने जगभरातून ७० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. त्यामुळे रितेशचा वेड सिनेमा मालामाल झाला असून तो लवकरच १०० कोटींच्या क्लब मध्ये जाईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.पहिल्या दिवसापासूनच 'वेड'नं बॉक्स ऑफिसवर त्याची घट्ट पकड निर्माण केली होती. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ४० कोटींचा टप्पा पार केला आणि तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने तब्बल ५० कोटींची कमाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने