पुष्पातील श्रीवल्लीवर कांतारातील रिषभ भडकला! म्हणाला, "मला अशा अभिनेत्री सोबत..."

मुंबई: कांताराचे दिग्दर्शक रिषभ शेट्टीने साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. रश्मिका मिशन मजनूमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. दरम्यान कांतारा चित्रपटाचे दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या किरिक पार्टी या कन्नड चित्रपटातून पदार्पण केलेल्या रश्मिकाचा जुन्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रश्मिका तिच्या पहिल्या चित्रपटासाठी कास्ट केलेल्या प्रोडक्शनबद्दल बोलताना दिसत आहे. अभिनेत्रीने व्हिडिओमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी. यानंतर चाहते त्याला सतत ट्रोल करत आहेत.कांतारा चित्रपटातील अभिनेता आणि दिग्दर्शक  रिषभ  शेट्टी यांनी २०१८ साली किरिक पार्टी नावाचा चित्रपट बनवला होता. या चित्रपटातून रश्मिका मंदानाने अभिनय विश्वात पदार्पण केले आणि यश मिळवले. गेल्या काही आठवड्यांपासून दिग्दर्शक आणि  रश्मिकामध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. 

चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल  रिषभ ने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये रश्मिकाला टॅग केले नाही. यामुळे वाद झाला आहे. यानंचर रश्मिकाने देखील एका मुलाखतीत संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, परंतु  रिषभचे नाव घेतले नाही. आता  रिषभने यावर मौन तोडले आहे.रिषभ शेट्टी यांनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रिषभ शेट्टी म्हणाला, "मला यात कोणतीही अडचण नाही. याशिवाय मी अनेक कलाकारांना लॉन्च केले आहे. तसेच अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनीही संधी दिली आहे. अशा लोकांची मोठी यादी आहे."रिषभ   म्हणाला, "मी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर मुख्य कलाकारांची निवड करतो आणि मला अशा अभिनेत्री अजिबात आवडत नाहीत. मी नवीन लोकांसोबत काम करण्यास प्राधान्य देतो कारण ते कोणत्याही अडथळ्याशिवाय येतात."


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने