एकेकाळी इरफाननं शाहरुखशीही घेतला होता पंगा, भर पत्रकार परिषदेत म्हणाला होता..

मुंबई: आपल्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जाणारा इरफान खान आज आपल्यात हयात नसला तरी त्यानं साकारलेल्या भूमिकांच्या माध्यमातून तो आजही त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. आज इरफानच्या वाढदिवसाच्या निमित्तांनं त्याची एक आठवण आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.एप्रिल २०२० मध्ये इरफान खाननं जगाचा निरोप घेतला तेव्हा त्याचं वय ५३ वर्ष होतं. त्याला पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते कायम उत्सुक असायचे. कारण नेहमी तो प्रत्येक सिनेमात वेगळी भूमिका साकारण्याचा प्रयत्न करायचा. 
'हासिल' आणि 'मकबूल' सिनेमात त्यानं साकारलेला गॅंगस्टार असो की 'गुंडे' सिनेमातील पोलिस ऑफिसर असो किंवा मग 'कारवां' किंवा 'पिकू' सिनेमातील ड्रायव्हरची भूमिका असो...इरफानचा प्रत्येक अंदाज थिएटरमध्ये पैसे खर्च करुन सिनेमा पहायला आलेल्या प्रेक्षकाला समाधान मिळवून द्यायचा.पण या सगळ्या भूमिकांमध्ये इरफानच्या रोमॅंटिक अंदाजाची चर्चा फारशी ऐकायला मिळत नाही. त्याचा रोमान्सचा अंदाज टिपिकल बॉलीवूड स्टाइल रोमान्सपेक्षा थोडा वेगळा राहिलाय.सिनेमात इरफाननं रोमान्स तसा कमीच केला,पण जेव्हा केला तेव्हा मात्र त्याचं टोक गाठलेलंच पहायला मिळालं. 'रोग' या २००५ मध्ये आलेल्या सिनेमात इरफानला एका अशा मुलीशी प्रेम होतं,जिच्या हत्येचा तपास तो करत असतो.सिनेमाच्या कहाणीत पुढे खूप सारे सस्पेन्स आणि ट्वीस्ट होते, पण सिनेमातील रोमान्सच्या बाजूनं विचार केला तर इरफानची त्या अंदाजातील भूमिका एकदम हटके होती. विशाल भारद्वाज यांच्या २००३ साली आलेल्या क्लासिक 'मकबूल' सिनेमात इरफाननं गॅंगस्टारची व्यक्तिरेखा साकारली होती.सिनेमाची कथा अशी होती की ज्यात इरफानची जी व्यक्तीरेखा होती ती प्रेम व्यक्त करु शकत नव्हती. 'मकबूल मिया'ला प्रेम आपल्या मर्यादेत राहून करायचं असतं, ते व्यक्त करताना त्याच्या मनात भावनांचा खूप कल्लोळ असतो..आणि व्यक्त केलं तर त्याच्यापासून निर्माण होणारे संभाव्य धोके देखील त्याला दिसत असतात.पण ज्या पद्धतीनं इरफाननं ती व्यक्तिरेखा साकारली होती त्यातून त्याच्या मनातील प्रेमाची भावना समोरच्या प्रेक्षकालाही फिल करता येतील अशी अभिनयाची जादू त्यानं ती भूमिका साकारताना केली होती. इरफान त्याच्या डोळ्यातून ज्या पद्धतीनं त्या सिनेमात बोललाय हे काबिले तारिफ..

आता त्याचा २०१३ मध्ये आलेला 'लंच बॉक्स' सिनेमाच पहा ना...त्या सिनेमात इरफानच्या व्यक्तिरेखेला ज्या महिलेसोबत प्रेम होतं..ती त्याच्या समोरही कधी आलेली नसते. फक्त चिठ्ठीतून ते बोलत असतात. त्या सिनेमात जेव्हा तो बालकणीत किंवा कॅंटीनमध्ये बसलेला दाखवलाय तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दिसणारे हावभाव पाहून आपण प्रेक्षक म्हणून हे ओळखू शकतो की त्याच्या मनात काय चाललं आहे.रोमान्सच्या बाबतीत इरफानची सगळ्यात एक्सप्रेसिव्ह कुठली भूमिका असेल तर ती 'करीब करीब सिंगल' सिनेमातील.या सिनेमात टिपिकल बॉलीवूड रोमान्स नव्हता. त्यात एक रियल कनेक्शन पहायला मिळालं. रोमान्सचा एक वेगळाच अंदाज इरफानच्या 'सात खून माफ' मध्ये पहायला मिळाला. या सिनेमात इरफानने प्रियंका चोप्राच्या ७ पतींपैकी एकाची भूमिका साकारली होती.

२००३ साली आलेल्या 'हासिल' सिनेमात त्यानं साकारलेल्या गॅंगस्टर रणविजय सिंगची आठवण आजही डोक्यात फिट्ट असेल अनेकांच्या. यामध्ये एका मुलीच्या प्रेमासाठीच रणविजयचा सर्व खेळ सुरु असतो.एकदा 'रोग'चं प्रमोशन करताना इरफान खानला मुलाखती दरम्यान विचारलं गेलं होतं की, 'पडद्यावर तो शाहरुख खानसारखा रोमान्स साकारू शकतो का?' याचं उत्तर इरफाननं खूप मजेदार अंदाजात दिलं होतं. तो म्हणाला होता, ''शाहरुख खान नाना पाटेकरांचा कोणताच सिनेमा करु शकत नाही,तसंच नाना पाटेकरी शाहरुखचा कोणता सिनेमा करु शकणार नाहीत. आणि त्याप्रमाणे मी देखील दुसरे अभिनेता करतीत ते नाही करू शकत''.'मकबूल' आणि 'रोग' दोन्ही सिनेमांचे कथानक रोमॅंटिक होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने