बिनधास्त निकाल जाहीर करा..मेघा धाडेनं सांगून टाकली विज्येत्यासह रनरअपची नावं

मुंबई: बिग बॉस ४ चं पर्व आता हळूहळू शेवटाकडे प्रवास करत आहे. आता घरात आहेत टॉप ५..अमृता धोंगडे,किरण माने,अक्षय केळकर,अपूर्वा नेमळेकर आणि राखी सावंत. उद्या रविवारी पार पडतोय या सिझनचा फिनाले.गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट सगळे पाहत होते तो दिवस आता येतोय, त्यामुळे अर्थातच घरातील स्पर्धकांच्याच नाही तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांच्या मनातील धाकधूकही वाढलेली आहे.आता अंदाज लावले जातायत कोण असणार टॉप ३, कोण असणार टॉप २ आणि कोण ठरणार विजेता...यादरम्यान बिग बॉस सिझन १ ची विनर मेघा धाडेनं मोठं वक्त्व्य करत अख्खा निकालच सांगून टाकला आहे.मेघा धाडे तिच्या सिझनमध्ये सर्वात शेवटी निवडली गेलेली सदस्य होती. तिच्याशी ईसकाळनं संपर्क साधला असता ती म्हणाली, ''माझ्यावेळी केवळ चार दिवस आधी माझी निवड झाली होती. त्यात बिग बॉस मराठी पहिलाच सीझन..पाटी पूर्ण कोरी...बिग बॉस हिंदी सारखं मराठी बिग बॉसमध्ये वागून चालणारच नव्हतं. प्रेक्षकवर्ग पूर्ण वेगळा असतो. शिव्या चालणार नाहीत, ओव्हर रिअॅक्ट होणं देखील चालणार नव्हतं, प्रेमाचे चाळे तर बिलकूलच चालणार नव्हते त्यामुळे सद्सदविवेक बुद्धीला चालना देतच वागावं लागलं होतं. आणि माझे संस्कारच त्यावेळी फायद्याचे ठरले...आणि मी पहिल्या पर्वाची विजेती ठरले.मी अभ्यास करुन गेलेले हे जे काही गेल्या अनेक वर्षात माझ्या कानावर पडतंय हे धांदांत खोटं आहे हे मी आता सांगू इच्छिते''.आपल्या मुलाखतीत मेघा म्हणाली, ''मी यंदाचा बिग बॉस सिझन ४ पाहिलं त्यातनं एकच नाव माझ्या डोळ्यासमोर येत आहे. किंबहुना मी या तिघांना टॉप ३ मध्ये पाहते. त्यात सेकंड रनर अप अमृता धोंगडे...फर्स्ट रनर अप अपूर्वा नेमळेकर आणि विजेता ठरेल किरण माने...आता कदाचित अनेकांना अपूर्वा वाटत असेल पण मला ती विजेती म्हणून दिसत नाही...''याचं कारण सांगत मेघा म्हणाली, ''अपू्र्वानं टास्क फारसे चांगले खेळले नाहीत. शेवटचा टास्क सोडला तर संपूर्ण सिझन दरम्यान टास्कमध्ये ती मागे पडली.

 बिग बॉसचा महत्त्वाचा जो टास्क असतो त्यात तर फक्त आरडा-ओरडा करताना दिसली''.'' ती नेहमी दुसऱ्याला मागे पाडायला गेली पण तिला कुणी पाडायचा प्रयत्न केला तेव्हा तिचं स्पोर्टिंग स्पिरीट मुळीच दिसलं नाही...याउलट किरण मानेंचे आहे. त्यांनी हा गेम खूप संयमानं खेळलाय''.''जिथं ओरडणं गरजेचं तिथे ते लाउड झाले,जिथे बॅलन्स आवश्यक तिथे तो त्यांनी ठेवलेला दिसलाय..संयम राखत त्यांनी अनेकदा परिस्थीती हाताळलीय...अंगावर आलं तेव्हा खांद्यावरही घेतलेले किरण माने मी पाहिलेयत...जे अपूर्वाला संपूर्ण सिझनमध्ये जमले नाही. आणि याच किरण मानेंच्या गुणांमुळे तेच विजेता ठरणार हे मी कन्फर्म सांगते''.आता मेघा धाडे सिझनची पहिली विजेती असल्यानं तिला बिग बॉस हा खेळ माहितीय. त्यामुळे तिनं लावलेला अंदाज किती खरा ठरतोय याकडे आपल्या सगळ्यांचे लक्ष लागून राहणार हे निश्चित. आता एकच दिवस शिल्लक...तेव्हा मेघाच्या मते किरण माने पण तुमच्या मते कोण ठरणार विजेता?

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने