कोरोना काळात घोटाळा ; सोमवारपासून ED चौकशी, सोमय्यांचा दावा!

मुंबई : ईडी आणि महाराष्ट्र असं समीकरण महाराष्ट्रात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या संपत्तीवर काल ईडीने छापेमारी केली. आता पुन्हा एका ईडी नवीन घोटाळ्याची चौकशी करणार आहे. या घोटाळ्याबाबात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. कोरोना काळात वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. 
दरम्यान या प्रकरणी मुंबई पालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला नोटीस आली आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. या प्रकरणात सोमवारपासून चौकशी सुरु होणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. लाईफ लाईन मॅनेजमेंट प्रकरणातील हे प्रकरण आहे. या बाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या जवळकीतेचा वापर करुन जी कंपनी अस्तित्वा नव्हती त्या संजय फाटकर यांच्या कंपनीला जंबो कोव्हीड सेंटर चालवण्याठी करार केला. त्यांनी दिले कागदपत्र बोगस दिले होते, या प्रकरणी चौकशी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने