आता राणा यांच्या भगव्या साडीवरुन वाद; अंधारेंनी उकरुन काढली 'ती' गोष्ट

मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पठाण चित्रपटाच्या वादावर भाष्य करत खासदार नवनीत राणा यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. बीडमधील कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यामध्ये बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “सध्या पठाण नावाच्या चित्रपटातील एका गाण्यावरुन बराच वाद आणि चर्चा होत आहे. दीपीका पादुकोणच्या त्या गाण्यात खान नावाचा कलाकार आहे म्हणून गाण्यावर आक्षेप घेतला जातोय का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.तर पुढे बोलतं सुषमा अंधारे म्हणाल्या की, पण तशाच भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण डान्स केला आहे. पण नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही. का बरं? नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख, तांबोळी असं काहीच नाही म्हणून का?”असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला आहे.काय म्हणाल्या आहेत सुषमा अंधारे?

सध्या पठाण नावाच्या चित्रपटातील एका गाण्यावरुन बराच वाद आणि चर्चा होत आहे. दीपीका पादुकोणच्या त्या गाण्यात खान नावाचा कलाकार आहे म्हणून गाण्यावर आक्षेप घेतला जातोय का? पण तशाच भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण डान्स केला आहे. पण नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही. का बरं? नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख, तांबोळी असं काहीच नाही म्हणून का?”गेल्या काही दिवसांपासून पठाण चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटातील एका गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादूकोणने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटला. या वादावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या या चित्रपटात खान नावाचा व्यक्ति असल्यामुळे हा वाद निर्माण केला जात असल्याचे बोलले जात असतानाच सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेत खासदार नवनीत राणा यांना लक्ष केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने