जगातीत सर्वात उंच असल्याचा दावा करणारा कोण आहे 'हा' व्यक्ती?

दिल्ली: अनेकदा आपण जगातील उंच, कमी उंचीच्या व्यक्तीविषयी वाचलं असणार. सध्य अशाच एका उंच व्यक्तीसंदर्भात दावा केला जातोय की हा जगातील सर्वात जास्त उंच असणारा व्यक्ती आहे.अवूक म्हणून ओळखला जाणारा हा व्यक्ती तेथील स्थानिक तपासणीनुसार ९ फुट ६ इंचीचा आहे. त्यामुळे तो जगातील सर्वात उंच माणूस आहे असा दावा केला जातोय पण हे खरंय का? उत्तर घनात या व्यक्तीची तपासणी केले असता हा आकडा समोर आलाय मात्र मोजमापचे अचूक साधने नसल्याने हा आकडा ग्राह्य धरला जात नाही.



कारण या व्यक्तीची उंची मोजण्यासाठी या व्यक्तीला एका रॉडच्या विरूद्ध सरळ उभे राहण्यास सांगितले होते. मात्र तो स्केलपेक्षाही उंच होता. त्यामुळे डॉक्टर थक्क झाले.खरंच हा व्यक्ती एवढा उंच आहे का? खरंच तो विश्वविक्रमाचा मानकरी आहे?अवूकच्या मते त्याची उंची अजूनही वाढतेय. त्याचे वय २९ वर्षे असून त्याला दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात. यासाठी तो दर महिन्याला डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो.सध्या या अवूकविषयी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकरी त्याच्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने