पंचगंगेत हजारो मासे मृत्युमुखी

कोल्हापूर : कोल्हापूरपाठोपाठ आता तेरवाड (ता. शिरोळ) येथील नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याने पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.गेल्या काही दिवसांपासून नदीला काळेकुट्ट मलयुक्त सांडपाणी येत आहे. दूषित पाण्यामुळे कोल्हापूर येथे नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडले होते. कोल्हापूरपासून मृत मासे वाहून येण्याबरोबरच दूषित पाण्याची तीव्रता वाढल्याने तेरवाड येथील नदीपात्रातील मासे मृत्युमुखी पडून बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला होता. स्वाभिमानी कार्यकर्ते बंडू पाटील, विश्वास बालीघाटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती देऊन पंचनामा करण्याची मागणी केली.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने