सिकंदर विरोधात चार गुण देणाऱ्या पंचाला पोलिस शिपायाने दिली धमकी

पुणे: यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पैलवाल शिवराज राक्षेने पटकावला. मात्र स्पर्धेत सर्वात चर्चेत राहिला तो पैलवान सिकंदर शेख होता. महेंद्र गायकवाडने उपांत्य फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार होता.महाराष्ट्र केसरीत सिकंदर शेख विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोन वरून कुस्ती स्पर्धेत पंच यांना धमकी दिली. फोन रेकॉर्डिग देखील समोर आली आहे. संग्राम कांबळे यांनी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांचा कुस्तीतील पंच मारुती सातव यांना फोन करून लाज काढली.धमकी नंतर पंच मारूती सातव याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे तक्रार अर्ज केला. या तक्रारीचा अर्ज संपूर्ण प्रकरणी संदीप भोंडवे, महाराष्ट्र केसरी स्पर्धा समिती कडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.काय आहे प्रकरण ?

माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात उपांत्य सामना पार पडला होता. महेंद्र गायकवाडने दुसऱ्या फेरीत 4 गुण मिळवत सिकंदर शेखवर 5-4 अशी आघाडी घेतली पण महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील डांग हा डाव ही व्यवस्थीत झाला नव्हता. मग सिकंदर चार गुण कशाचे दिले गेले? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते. याचा जाभ विचारण्यासाठी संग्राम कांबळे यांनी थेट पंच मारुती सातव यांना धमकी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने