आता खुप झालं! टिनाचा गेम खल्लास...

मुंबई: बिग बॉस हिंदीचा यंदाचा 16वा सिझन हा चांगलाच रंगात आला आहे. आता हा शो फिनालेच्या जवळ पोहचला आहे. त्यामुळं घरातुन स्पर्धक एकएक करत घराबाहेर पडणार आहे. त्यातच घरात आता आता घरात फक्त 8 स्पर्धक उरले आहेत. या सदस्यामध्ये आता घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धा रंगली आहे.या सदस्यांपैकी यावेळी चार सदस्य नॉमिनेट झाले होते. यात शालीन भानोत, टीना दत्ता, प्रियंका चहर चौधरी आणि शिव ठाकरे यांचा सामावेश होता.मात्र आता घरातून टीना दत्ताचा पत्ता कट होणार आहे. टीना दत्ताचा घरातुन बाहेर होण्यासाठी नंबर लागणार असल्याचं बोललं जातं आहे. आता दावा करण्यात येत आहेत की या आठवड्यात टीना दत्ताला कमी मतांमुळे बाहेर काढलं जाणार आहे.
टीनाने शोमध्ये शालीनसोबत 'लव्ह हेट' गेम खेळला होता. मात्र, आता त्याचा काही फायदा झाला नाही. त्याचबरोबर तिला सलमाननेही खुप फटकारलं होतं त्यामुळे ती खुप रडलीही आणि घरी जाण्यासाठी विणवण्याही करु लागली.मात्र त्यांनतर ती पुन्हा घरात हसू खेळू लागली. त्यामुळं प्रेक्षकांना तिचं वागणं हे फक्त नाटकं वाटू लागलं. याचाही परिणाम तिच्या मतांवर झाला असावा. त्यामुळे फिनालेच्या काही आठवड्यांपूर्वीच ती बेघर झाली आहे.

दरम्यान, शुक्रवारच्या वॉर एपिसोडचा प्रोमोही समोर आला आहे, ज्यामध्ये यावेळी होस्ट सलमान खान नसून फराह खान दिसत आहे. ती टीना दत्ताला खूप फटकारते. यासोबतच प्रियांकाचीही शाळा घेते. मात्र त्यावेळी टीना तिला तिचा अ‍ॅटिट्यूड दाखवते आणि फराहला तिची ही वृत्ती अजिबात आवडत नाही आणि ती निघून जाते. शोचा फिनाले 12 फेब्रुवारीला आहे. मात्र, अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने