अशी संधी पुन्हा येणे नाही; 50 हजारात फिरा थायलंड, बँकॉक, पटाया अन् बरंच काही!

मुंबई: जर या नवीन वर्षात तुम्ही परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आयआरसीटीसी ने आणलेली ही नवी ऑफर तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल. थायलंड टूर साठी 'थायलंड स्प्रिंग फेस्टिव्हल टूर' नावाने एक जबरदस्त पॅकेज भारतीय रेल्वेने आणले आहे. जर तुम्हाला कुटुंबासह विदेश वारी करायची असेल तर कमी खर्चात तुमची ट्रीप होऊ शकेल.
काय आहे पॅकेज

  • आयआरसीटीसीच्या या नव्या ऑफरमध्ये ५ रात्री आणि ६ दिवसांच पॅकेज मिळतं.

  • यात तुम्हाला थायलंड, बँकॉक, पटाया फिरायला मिळेल.

  • ही टूर २१ जानेवारी ते २६ जानेवारी २०२३ दरम्यान असेल.

  • यात कोलकत्ताहून टूर सुरू होईल.

  • कोलकत्त्याहून बँकॉक, पटाया असे फिरवले जाईल.

  • या पॅकेजमध्ये रेल्वेकडून राहण्या, खाण्याच्या सोयी बरोबर सर्व आवश्यक गोष्टींची सोय असणार आहे.

  • ज्या हॉटेलला राहण्याची सोय केली जाईल तिथून पुढे फिरण्यासाठी वाहन सोयदेखील असणार आहे.

  • शिवाय एक गाइड सुध्दा देण्यात येणार आहे.

किती येणार खर्च

  • जर एकटेच जाणार असाल तर ५४ हजार ३५० रुपये खर्च आहे.

  • जर दोघे किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र जाणार असाल तर ४६ हजार १०० रुपये प्रति व्यक्ती खर्च येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने