ऋषी सुनक यांच्याकडून मंत्र्याची हकालपट्टी

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी करचुकवेगिरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कॅबिनेट मंत्री आणि कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे अध्यक्ष नधिम झहावी यांची हकालपट्टी केली आहे. झहावी यांनी मंत्र्यांसाठीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा अहवाल चौकशी समितीने दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सुनक यांनी स्पष्ट केले आहे.पंतप्रधान सुनक यांनी नधिम झहावी यांना पत्र लिहून कारवाईची माहिती दिली आणि हे पत्र जाहीरही केले. ‘पंतप्रधानपदाची शपथ घेताना मी जनतेला पारदर्शक आणि एकनिष्ठ सरकार देण्याचे वचन दिले होते. करचुकवेगिरीच्या प्रकरणावरून या एकनिष्ठतेवर संशय निर्माण होऊ लागला होता.त्यामुळे तुम्हाला तुमच्या सरकारी पदावरून हटविण्यात येत आहे,’ असे सुनक यांनी या पत्रात म्हटले आहे. सुनक यांनी चौकशी समितीचा अहवालही प्रसिद्ध केला आहे. सरकारच्या शिस्तपालन समितीचे सल्लागार लॉरी मॅग्नस यांनी हा अहवाल तयार केला होता.झहावी यांची चौकशी सुरु असताना त्यांनी वारंवार आपल्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यांना याबाबत चुकीची माहिती दिली. दरम्यानच्या काळात ते बोरीस जॉन्सन आणि लिझ ट्रस यांच्या काळात अर्थमंत्रीही होते. मात्र, नंतर त्यांना जवळपास पन्नास लाख पौंडांचा दंड भरावा लागला. याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी अनेकदा उडवाउडवीची उत्तरे दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने