कार्तिक आर्यनसोबत लग्नात आमिरनं केली 'ही' हरकत..लोक म्हणू लागले,'आता हेच होतं बाकी..'

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला नुकतंच आपली एक्स वाइफ किरण राव सोबत भोपाळमधील एका लग्नात स्पॉट केलं गेलं. त्या लग्नातूनच आता आमिरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायर होताना दिसत आहे.ज्यामध्ये तो बॉलीवूडचा 'शहजादा' कार्तिक आर्यनसोबत दिसत आहे. आमिरने या लग्नात आपला सुपरहिट सिनेमा 'राजा हिंदुस्थानी' मधील 'आए हो मेरी जिंदगी में' हे गाणं गायलं आहे. याव्यतिरिक्त आमिर आणि कार्तिकनं आपलं गाण्याचं आणि डान्सचं टॅलेन्टही लग्नात दाखवलं आहे आणि चाहत्यांना खूश करून टाकलं.पण याच व्हिडीओमुळे आता सोशल मीडियावर आमिरवर ट्रोलर्सनी निशाणा साधायला सुरुवात केली आहे.५७ वर्षाचा आमिर खान व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यन आणि पंजाबी गायक जसबीर जस्सी सोबत पोझ देताना दिसत आहे. याव्यतिरिक्त आमिर आणि कार्तिक दोघंही अनेक पेप्पी डान्स नंबर्सवर ठेका धरताना दिसले.भारतीय पारंपरिक पेहरावात 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचा अभिनेता आमिर आपल्या वयाचा पूर्णपणे आनंद घेताना दिसला. तर कार्तिक देखील ऑल ब्लॅक लूकमध्ये मुलींना घायाळ करताना दिसला.जसं या लग्नातले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले तसं लोकांनी आमिर खानवर निशाणा साधत त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'फिल्मी करिअर तर संपलं याचं'. आणि दुसऱ्या एकानं लिहिलं आहे की,'आता बस्स एवढंच करायचं बाकी होतं'.थोडक्यात माहितीसाठी इथं सांगतो की,आमिर खाननं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक घोषणा करत सगळ्यांना हैराण करून सोडलं होतं. हा निर्णय त्यानं आपला शेवटचा सिनेमा 'लाल सिंग चड्ढा' नंतर घेतला होता. तब्बल ३ वर्षानंतर रिलीज झालेल्या आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमानं बॉक्सऑफिसवर अक्षरशः मान टाकली होती.

यानंतर आमिरनं एक विधान केलं होतं की, ''जेव्हा मी एखादा सिनेमा करत असतो,तेव्हा मी इतका त्यात दंग होऊन जातो की माझ्या आयुष्यात त्याव्यतिरिक्त इतर काहीच महत्त्वाचं राहत नाही. हेच कारण आहे की मी आता कामातून ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे''.''मला माझ्या कुटुंबासोबत आता रहायचं आहे. माझी आई आणि मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. मी गेल्या ३५ वर्षांपासून काम करत आहे आणि आता मला वाटतं की मी माझ्या सिनेमाच्या विश्वात इतकं स्वतःला झोकून दिलं की माझ्या कुटुंबाला वेळच दिला नाही. आणि माझ्या त्या सर्व जवळच्या माणसांसोबत मी चुकीचं केलं''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने