सतरा वर्षांत १६ महिला महापौर; तरीही दुखणे कायम...

कोल्हापूर : गेल्या सतरा वर्षांत तब्बल १६ महिला महापौरपदी विराजमान झाल्या. मात्र, त्यांना शहरातील महिलांचे दुखणे कळालेच नाही.महिला असूनही महिला स्वच्छतागृहे शहरात झाली पाहिजेत, याविषयी एकाही महिला महापौरांनी प्रयत्न केलेले दिसले नाहीत. नेहमीप्रमाणे महिला स्वच्छतागृहांविषयी या महापौरानींही उदासिनताच दाखवली.परिणामी, कोल्हापुरात महिला स्वच्छतागृहांची उभारणीच झाली नाही. गेल्या दोन वर्षांत, तर आयुक्त तथा प्रशासक म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे कार्यरत आहेत.त्यांनीही महिला स्वच्छतागृहांच्या कामाला गती दिली नाही. महिलांचे दुखणे महिला लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनाही कळले नाही, ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.त्येक क्षेत्रात महिला आघाडीवर काम करत आहेत. 



तशाच राजकीय, शासकीय कार्यालयांमध्येही महिलांचे प्रमाण वाढले. महिला पर्यटकही मोठ्या प्रमाणात कोल्हापूरला भेट देतात. त्यामुळे शहरात गर्दीच्या ठिकाणी महिलांची स्वच्छतागृहे असावीत, असा नियम आहे. मात्र, या नियमांकडे महिला महापौरांसह अधिकाऱ्यांनीही साफ दुर्लक्ष केले. १९९४ ला पहिल्या महिला महापौरपदाचा मान जयश्री जाधव यांना लाभला.त्यानंतर कांचन कवाळे, सई खराडे, वंदना बुचडे, कादंबरी कवाळे, जयश्री सोनावणे, प्रतिभा नाईकनवरे, सुनीता राऊत, तृप्ती माळवी, वैशाली डकरे, अश्विनी रामाणे, हसिना फरास, स्वाती यवलुजे, शोभा बोंद्रे, सरिता मोरे, माधवी गवंडी, ॲड. सुरमंजिरी लाटकर व निलोफर आजरेकर अशा तब्बल १८ महिला महापौर होऊन गेल्या. मात्र, यापैकी अपवाद वगळता महिलांचे दुखणे कळलेच नाही, असेच म्हणावे लागेल.(समाप्त)

करारात मोफत; प्रत्यक्षात लूट

रंकाळा उद्यान येथे महापालिकेची सुलभ शौचालयाची सोय आहे. बसस्थानकावर एसटी महामंडळाचीही शौचालय सुविधा आहे. मात्र, येथील शौचालये अत्यंत अस्वच्छ असतात. वास्तविक ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ तत्त्वावर हा ठेका दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने