प्रभाकरन जिवंत आहे; तमिळ नेत्याचा धक्कादायक दावा

तामिळनाडू: लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा प्रमुख (LTTE) वेलुपिल्लई प्रभाकरन याच्याबाबत तमिळ नेत्याने धक्कादायक खुलासा केला आहे.वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तामिळचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी तमिळनाडूच्या तंजावरमध्ये एक निवेदन जारी करून हा दावा केला आहे.प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करत योग्य वेळ आल्यावर प्रभाकरन जगासमोर येईल असे नेदुमारन यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी तामिळनाडू सरकार, पक्ष आणि तामिळनाडूतील जनतेला प्रभाकरनच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. आपण प्रभाकरनच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचेही या नेत्याने म्हटले आहे.

2009 मध्ये श्रीलंकन ​​लष्कराने लष्करी कारवाई सुरू केली होती ज्यात प्रभाकरन मारला गेल्याचे सांगण्यात आले होते.मात्र, आता प्रभाकरनबाबत करण्यात आलेल्या या दाव्याने खळबळ उडाली असून, प्रभाकरन लवकरच तामिळ वंशाच्या मुक्तीसाठी योजना जाहीर करणार आहे. जगातील तमाम तमिळ जनतेने संघटित होऊन त्याला पाठिंबा द्यावा असे आवाहनही नेदुमारन यांनी केले आहे.प्रभाकरनची २००९ मध्ये झाली होती हत्या

लिट्टे या तमिळ वाघांच्या संघटनेचा प्रमुख असलेला व्ही प्रभारकन याचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या श्रीपेरांबुद्दूर येथे झालेल्या भीषण हत्येत त्याचा सहभाग होता. 2009 मध्ये श्रीलंकन ​​लष्कराने लष्करी कारवाई सुरू केली होती, ज्यात प्रभाकरन मारला गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

वेगळ्या तमिळ राष्ट्राच्या मागणीसाठी झाली होती LTTE ची स्थापना

  • लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच LTTE ही श्रीलंकेची दहशतवादी संघटना असून. तामिळींसाठी वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. वेलुपिल्लई प्रभाकरन हा या संघटनेचा प्रमुख होता.

  • 80 च्या दशकानंतर एलटीटीईला अनेक देशांकडून पाठिंबा मिळू लागला आणि याची ताकद वाढत गेली. 1985 मध्ये,श्रीलंका सरकारने तमिळ बंडखोरांमध्ये शांतता चर्चेचा पहिला प्रयत्न केला, जो अयशस्वी झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने