श्रीअन्न योजना आहे तरी काय? शेतकऱ्यांना मोठा फायदा

 दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सुरुवातीच्या भाषणातच त्यांनी शेतकरी आणि पिकांचा उल्लेख केला. बुधवारी त्यांनी देशात भरडधान्य उत्पादनासाठी श्रीअन्न योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, श्रीअन्न योजनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.भाषणादरम्यान, अर्थमंत्री सीतारामन यांनी देशातील बाजरी म्हणजेच भरड धान्याचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नांबद्दल सांगितले. यासाठी त्यांनी इंडियन मिल्ट्स इन्स्टिट्यूटच्या स्थापनेबद्दलही भाष्य केले. यासोबतच देशात श्रीअन्न योजना सुरू करण्यात येणार असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांना भरड धान्य उत्पादनासाठी प्रोत्साहित केले जाईल.

तर काय आहे श्रीअन्न योजना?

देशात ज्या ठिकाणी भरड धान्य घेतली जातात त्या भरड धान्यासाठी हब तयार करण्यात येणार असल्याची घोषणा सितारामन यांनी केली. याचबरोबर भरड धान्याला "श्री अन्न' असे नाव देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.2 हजार 516 कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशभरात प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करून साठवणुकीचे विकेंद्रीकरण करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करणार असल्याची घोषणा सितारामन यांनी केली.बाजरी का खास आहे?

ज्वारी, बाजरी, नाचणी, सावन, कांगणी, चेना, कोडो आणि कुट्टू या भरडधान्यांचा समावेश बाजरी पिकांच्या वर्गवारीत होतो. जीवनसत्त्वे, खनिजे, आहारातील फायबर किंवा इतर पोषक तत्वांच्या बाबतीत बाजरी फायदेशीर आहे. 2016-17 च्या आकडेवारीवरून असे म्हटले जाते की, वापरातील बदलांमुळे बाजरीच्या लागवडीखालील क्षेत्रात झपाट्याने घट झाली आहे.

शेतकऱ्यांना फायदा

राज्यातील विदर्भात मोठ्या प्रमाणात धान्य उत्पादक शेतकरी आहेत. आज सादर केलेल्या श्री अन्न योजनेचा फायदा धान्य उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. याचबरोबर सोलापूर, सांगलीसह मराठवाड्यात ज्वारी बाजरीचे उत्पादन घेतले जाते. याचा फायदा या शेतकऱ्यांनाही होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने