१२५०० फुट उंचीचा केदारकंठा ट्रेक पूर्ण करून लक्ष्मण जगताप यांना युवकांची अनोखी श्रद्धांजली

केदारकांठा:  सभोवताली तीन फुट बर्फाची चादर, कमी ऑक्सिजन स्तर व मायनस १२ टेंपरेचर अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील तरुण शैलेश विजय जगताप आणि रोहित दत्तात्रय बालवडकर यांनी त्यांच्या सहका-यांसह केदारकंठा हा हिमालयीन ट्रेक नुकताच पूर्ण केला. यावेळी त्यांनी या ठिकाणी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली भारताचा तिरंगा आणि प्रेरणास्थान असणारे लक्ष्मण जगताप यांची प्रतिमा या ठिकाणी झळकावत बाराहजार फुट उंचीचा ट्रेक पूर्ण केला.केदारकंठा ट्रेक हा उत्तराखंड राज्यातील डेहराडून जवळ आहे. तसा अवघड प्रकारातील विंटर ट्रेक बर्फवृष्टी व बर्फाच्छादित ट्रेक हे या ट्रेकचे मुख्य आकर्षण आहे. ५ दिवसांचा ट्रेक पूर्ण करणे तसे सोपे काम नाही केदारकंठा ट्रेक हा साधारण १२५०० फूट उंचीवर आहे.उत्तराखंड मधील सर्वांत उंच ट्रेक केदारकंठा उंची १२५०० फुट असणारा हिमालयीन ट्रेक वीर सह्याद्रीच्या शिलेदारांनी पुर्ण केला.

केदारकंठा हिवाळ्यातील ट्रेक म्हणून प्रसिद्ध आहे कारण त्याच्या आजूबाजूला बर्फाच्छादित पर्वत आणि दऱ्यांचे अप्रतिम दृश्य आहे. हा ट्रेक सौंदर्य आणि साहस योग्य प्रमाणात एकत्र आणले तर बर्फात कसे जगायचे ते शिकवतो. गिचॉन गाव येथे बेसकॅम्प लावून पाच फेब्रुवारीला पहाटे ४ वा. चढाईला सुरुवात केली. ईंडीया हाईक या उपक्रमातून शैलैश जगताप, दत्तात्रय बालवडकर, इंद्रजीत इंगळे व सहका-यांनी हा ट्रेक पूर्ण करत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने