'सुनील शेट्टी मला पित्यासमान', आकाश चोप्राला नेटकऱ्यांनी धुतला, म्हणून केएल राहुलला...

मुंबई: प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा हा त्याच्या अघळपघळ चर्चेसाठी प्रसिद्ध असल्याचे दिसून आले आहे. आकाश हा गोष्टी रंगून सांगणारा व्यक्ती आहे. सध्या जेवढे भारतीय समालोचक आहेत त्यामध्ये आकाश चोप्राची लोकप्रियता मोठी आहे. त्याचे बोलणे, त्यातील कोट्या, उदाहरणं ही चर्चेचा विषय असतात.सध्या तर आकाश चोप्रा हा वेगळ्या व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. त्यामध्ये तो आणि प्रसिद्ध अभिनेता आणि बॉलीवूडचा अण्णा सुनील शेट्टी दिसत आहे. यावेळी आकाश चोप्रानं केलेला खुलासा त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होता.त्या व्हिडिओवर आलेल्या कमेंट्सदेखील भन्नाट आहेत. काही दिवसांपासून भारतीय संघाचा प्रसिद्ध फलंदाज केएल राहुल हा त्याच्या फॉर्मशी संघर्ष करताना दिसतो आहे.राहुल हा टँलेटेड खेळाडू आहे. मात्र सध्या त्याच्या बॅटमधून धावा होत नसून त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाच्याविरोधात दोन्ही टेस्ट मॅचमध्ये राहुल फ्लॉप झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याची व्हाईस कॅप्टनशिप वरुन हाकलपट्टी करण्यात आली. सोशल मीडियावरुन त्याच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अशावेळी आकाश चोप्रानं त्याच्या बाजुनं मत व्यक्त केलं आहे.आकाश चोप्राचा व्हायरल झालेला व्हिडिओ नेटकऱ्यांच्या टीकेचा विषय आङे. त्यामध्ये आकाश चोप्रा सुनील शेट्टीशी बोलतो आहे. सुनील शेट्टीला आकाश चोप्रानं आपला गुरु आणि पितासमान मानलं आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला, म्हणून तर तू केएल राहुलची बाजू घेत आहे का. असा प्रश्न विचारला आहे. काही दिवसांपूर्वी केएल राहुल आणि सुनील शेट्टीची मुलगी अथियाचा विवाहसोहळा पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने