अदानी समूहाच्या वादात आता RBI ची उडी ; बँकांकडून मागितली महत्त्वपूर्ण माहिती

दिल्ली: अदानी समूहाबाबतच्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर मोठी खळबळ माजली आहे.याचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून येत असतानाच काल अदानी समूहाने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी २० हजार कोटींचा एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानंतर आता आरबीआयने विविध देशांतर्गत बँकांना अदानी समूहाची गुंतवणूक आणि अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची माहिती देण्यास सांगितले आहे. यामुळे आता अदानी समूहाच्या या वादात आरबीआयने उडी घेतली आहे.सरकारी आणि बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, मध्यवर्ती बँकेने विविध देशांतर्गत बँकांना त्यांच्या गुंतवणूक आणि अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची माहिती देण्यास सांगितले आहे.सध्या जारी करण्यात आलेल्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या चढ-उतारानंतर रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे. अदानी समूहाने काल एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून आला. यात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.FPO मागे घेतल्यानंतर काय म्हणाले अदानी?

FPO मागे घेतल्यानंतर अदानी म्हणाले की, 'पूर्ण सदस्यता घेतलेल्या FPO नंतर, काल FPO मागे घेण्याच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले असेल. पण आज बाजारातील अस्थिरता लक्षात घेता, FPO बरोबर पुढे जाणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही असे बोर्डाला ठामपणे वाटले'पुढे ते म्हणाले, 'माझ्यासाठी, माझ्या गुंतवणूकदारांचे हित सर्वोपरि आहे आणि बाकी सर्व काही दुय्यम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना संभाव्य तोट्यापासून वाचवण्यासाठी आम्ही FPO मागे घेतला आहे.या निर्णयाचा आमच्या विद्यमान कार्यांवर आणि भविष्यातील योजनांवर परिणाम होणार नाही. आम्ही वेळेवर अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करू.'

'आमचा ताळेबंद निरोगी आणि मालमत्ता, मजबूत आहे. आमची EBIDTA पातळी आणि रोख प्रवाह खूप मजबूत आहेत आणि आमच्याकडे आमची कर्ज दायित्वे पूर्ण करण्याचा एक निर्दोष ट्रॅक रेकॉर्ड आहे. आम्ही दीर्घकालीन मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवू.' असे अदानी यांनी सांगितले.विशेष म्हणजे, अदानी यांनी मागे घेतलेला एफपीओ मंगळवारपर्यंत पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता. असे असूनही, हिंडेनबर्गचा अहवाल हे पैसे काढून घेण्याचे आणि गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यामागचे एक कारण असल्याचे मानले जाते, ज्यामुळे अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने