'माझं चुकलं, मला माफ कर!' साक्षात अमरीश पुरींनी आमिरची मागितली माफी, काय होतं कारण?

मुंबई: बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमरीश पुरी हे त्यांच्या परखड स्वभावासाठी ओळखले जायचे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. पुरी यांच्या जाण्यानंतर देखील ते त्यांच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात घर करुन असल्याचे दिसून आले आहे. अद्यापही त्यांची लोकप्रियता काही कमी झालेली नाही.दुसरीकडे बॉलीवू़डचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या आमिर खानची ओळख वेगळ्या पद्धतीनं करुन देण्याची गरज नाही. गेल्या वर्षी आमिरचा लाल सिंग चढ्ढा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र तो काही फारसा चालला नाही. आमिरला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. त्याला कारण त्याची परखड विधानं.जी नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही. पहिल्यांदाच आमिरला एवढ्या मोठ्या प्रमाणात अपयशाला सामोरं जावं लागलं होतं.कोणेएकेकाळी आमिरनं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली होती. आमीर हा नेहमीच त्याच्या परफेक्शनसाठी ओळखला गेला. बऱ्याच वर्षांपासून त्याला जडलेल्या या सवयीनं मात्र त्यानं दिग्गज अभिनेत्यांचा राग ओढावून घेतला होता. त्यामध्ये एक नाव अमरीश पुरी यांचे होते. अमरीश पुरीसोबत आमीरनं पंगा घेतला तेव्हा तो चर्चेत आला होता.आमिरच्या चुलत्यांच्या नासिर खान यांच्या चित्रपटामध्ये अमरीश पुरी काम करत होते. त्यावेळी आमिर सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत होता. यावेळी त्याच्याकडे कंटिन्युटी सांभाळण्याचे काम होते. एका सीनमध्ये अमरिश पुरी यांच्या हाताची दिशा दुसरा सीन करताना बदलली होती. ही गोष्ट आमिरच्या लक्षात आली. त्यानं ती अमरिश पुरी यांना सांगितली होती.

शुटमध्ये बिझी असलेल्या अमरीश यांना ती गोष्ट आवडली नाही. त्यांनी आमिरचा सगळ्यांसमोर अपमान केला. त्याला ओरडा खावा लागला. तेव्हा आमिरच्या चुलत्यांनी अमरिश पुरी यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर पुरी यांनी जे केले ते त्यांच्या मोठ्या पणाचे आणि मनाचे लक्षण होते. शेवटी अमरिश पुरी यांनी आमिरची माफी मागितली. तेव्हा ते प्रकरण शांत झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने