जयपूर मध्ये 'तो' प्रसंग घडला अन् अमिताभ-रेखाचं अफेअर असल्याची बातमी पहिल्यांदा समोर आली..

मुंबई: भारतीय सिने जगताचे महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या कहाण्या अगदी आजची पिढीही चवीनं वाचते अन् ऐकते. अनेक सिनेमातून या दोघांना एकमेकांवर प्रेम करताना आणि एकमेकांसाठी अनेकांशी लढताना पाहिलंय.एक काळ होता जेव्हा लोक ना केवळ यांच्या सिनेमावर तर यांच्या जोडीवरही भरभरून प्रेम करायचे. त्यामुळेच यांच्याशी जोडलेला प्रत्येक किस्सा आजही चर्चेचा भाग बनतो.आता एक बातमी पुन्हा नव्यानं समोर आली आहे जेव्हा रेखासाठी अमिताभ बच्चन यांनी मारामारी केली होती सिनेमात रेखा यांच्यासाठी अमिताभ बच्चन यांना मारामारी करताना आपण पाहिलं असेल पण तुम्हाला माहित आहे का १९७७ साली अमिताभ बच्चन यांनी रेखासाठी एका माणसाला चांगलं चोपलं होतं.

या किस्स्याचा उल्लेख रेखाचं आत्मचरित्र 'रेखा-द अनटोल्ड स्टोरी'मध्ये करण्यात आला आहे. यासीर उस्मान लिखित या पुस्तकात रेखा आणि अमिताभ 'गंगा की सौगंध' या सिनेमाचं जयपूरमध्ये शूट करत होते तेव्हाचा किस्सा आहे.बोललं जातं की त्यावेळी दोघांचं अफेअर सुरू होतं.पुस्तकात सांगितल्याप्रमाणे शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चनने एका माणसाची जोरदार पिटाई केली होती. शूटिंगसाठी जेव्हा हिरो-हिरोईन सेटवर पोहोचतात तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडते.अशामध्ये कितीतरी वेळा गर्दीला नियंत्रित करणं कठीण होऊन बसतं. अगदी असंच झालं जेव्हा शूटिंग लोकेशनवर अमिताभ-रेखाला पहायला मोठ्या संख्येनं लोक जमले होते. यादरम्यानं गर्दीत घुसलेल्या एका व्यक्तीनं रेखावर खूप घाणेरड्या कमेंट्स केल्या.बोललं जातं की खूप वेळा समजावल्यानंतरही तो माणूस त्या घाणेरड्या कमेंटस् करतच राहिला. अशामध्ये शूटिंग युनिटनं कितीतरी वेळा त्या माणसाला तंबी दिली. पण तो ऐकला नाही. तेव्हा अमिताभ बच्चन यांचा पारा चढला.मग काय बिग बी यांनी कसलाच विचार न करता त्या माणसाला चांगलाच चोप दिला. आता तो माणूस आणि ते प्रकरण तिथे जयपूरमध्येत मिटलं पण रेखा आणि अमिताभच्या अफेअरच्या चर्चा मात्र जयपूरमधून वाऱ्यासारख्या पसरल्या. पण या दोघांनीही तेव्हा काहीही प्रतिक्रिया देणं टाळलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने