संजय राऊत गरजले; शहाचं राज्याचे अन् मराठी माणसांचे...

मुंबई:   शिवसेनेचे नाव आणि चिन्हाच्या वादावरून राज्यात वाद पेटलेला असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.शिवसेना फोडण्यासाठी शेकडो कोटी खर्च केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. तसेच शिवसेना हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि सन्मान आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केल्याचं ते म्हणाले.नुकताच शहांचा महाराष्ट्र दौरा पूर्ण झाला आहे. त्यानंतर राऊतांनी हा आरोप केला आहे. राऊतांच्या या आरोपांमुळे भाजप आणि ठाकरे गटातील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असून, भाजप याला कसे उत्तर देते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा सर्वात मोठे शत्रू केंद्रीय मंत्री अमित शहा असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.नाव आणि चिन्हासाठी दोन हजार कोटींचा सौदा

दुसरीकडे राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल करताना पक्षाचे नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.आमची लढाई मिंधे गटासोबत नसून, देशाला हुकूमशाहीकडे नेणाऱ्या भाजपविरोधात असल्याचे राऊत म्हणाले. मिंधे गटाची आमच्या विरोधात लढण्याची पात्रता नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने