सलमान मांजरांच्या प्रेमात पडला, आता तर त्यानं....!

मुंबई: बॉलीवूडच्या भाईजानच्या चित्रपटांनी त्याच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. गेल्या काही वर्षांपासून चाहते सलमानच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. अंतिम नंतर सलमानचा बऱ्याच प्रतिक्षेनंतर किसी का भाई किसी का जान नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.सलमानचा चित्रपट म्हटल्यावर त्याची चर्चा तर होणारच. आपल्या वेगळ्या स्टाईल आणि परखड स्वभावासाठी सलमान ओळखला जातो. त्याला त्याच्या नव्या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या पठाणमध्ये शाहरुखसोबत सलमान खानची इंट्री झाली होती. त्यामध्ये शाहरुख आणि सलमानच्या जोडीला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती.बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने, आपल्या आउट-ऑफ-द-बॉक्स स्टाईलमध्ये सोशल मीडियावर 'किसी का भाई किसी की जान'मधील 'बिल्ली बिल्ली'हे नवीन गाणे रिलीज करण्याची घोषणा केली आहे.दर्शकांची उत्सुकता वाढवून, सलमानने या गाण्याच्या व्हिडिओमध्ये व्हिज्युअलऐवजी काही मांजरींसह फक्त गाण्याचा ऑडिओ प्रेक्षकांसमोर आणला आहे.आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' मधील 'बिल्ली बिल्ली' या गाण्याच्या ऑडिओला दर्शकांची पसंती मिळत आहे. निर्मात्यांनी हा ऑडिओ सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर देखील रिलीज केला आहे. अशातच, सिनेप्रेमी गाण्याच्या व्हिडिओ रिलीजची प्रतीक्षा करत असून, आपली उत्सुकता दर्शवत आहेत.'बिल्ली बिल्ली' एक जबरदस्त पंजाबी डांस नंबर असून, यामध्ये मेगास्टार आणि सुखबीर पहिल्यांदाच गाण्यासाठी सहयोग करत आहेत.सुखबीर हे चार्टबस्टर गाण्यांसाठी ओळखले जातात.

 या गाण्याचे संगीत सुखबीर यांनी दिले असून कुमार यांनी लिरिक्स लिहिले आहे. तसेच, सुरुवातीच्या ट्रेंडनुसार 'बिल्ली बिल्ली' चार्टबस्टर बनण्याच्या मार्गावर आहे.सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे.तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने