'ठाकरे सरकार पाडण्यासाठी...', कपिल सिब्बल यांनी मांडला मोठा मुद्दा

दिल्ली: सत्तासंघर्षानंतर शिंदे गटाच्या आमदारांवर खोके घेऊन बंड केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार होत आहे. आज सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात मोठा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या या युक्तिवादामुळे राजकीय वर्तुळात सिब्बल यांना खोकेप्रकरणावर तर कोर्टाचं लक्ष वेधायचं नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. कोर्टाची सुनावणी सुरू होताच शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला.नबाम रेबिया प्रकरणाचे संदर्भ देत अविश्वास प्रस्ताव असताना विधानसभेचे उपाध्यक्ष आमदारांना नोटीस पाठवूच कसे शकतात? असा सवाल करतानाच विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांचा पाच वर्षाचा अधिकार काढून घेण्याचा अधिकारच नसल्याचं महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांनी कोर्टाला स्पष्ट केलं.त्यांतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आलं, असा मोठा दावा कपिल सिब्बल यांनी केला. सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीशांची चर्चा सुरू झाली.मात्र, कोर्टाबाहेर सिब्बल यांच्या युक्तिवाद्यानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. खोकेप्रकरणावर तर कोर्टाचं लक्ष वेधायचं नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने