मंत्रिमंडळ विस्तारात तीन ते चार महिलांना मंत्रिपद मिळणार? चित्रा वाघ यांनी केलं स्पष्ट

पुणेः मागील कित्येक महिन्यांपासून राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. शिंदे गटातल्या आमदारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करुनही विस्ताराला मुहूर्त मिळत नाही. मात्र संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज पुण्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोठं विधान केलं आहे.आज पुणे शहरात भाजप महिला मोर्चाच्या कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कशा पद्धतीने आगामी निवडणुकांची रणनिती असेल याबद्दल चर्चा झाली. चित्रा वाघ बोलतांना म्हणाल्या की, नागपूरमध्ये आमचा उमेदवार नव्हताच. मात्र ज्या ठिकाणी हार झाली आहे तिथे आत्मपरीक्षण करू. विधान परिषदेमध्ये कधी ही न येणारी जागा भाजपने जिंकल्याच त्यांनी स्पष्ट केलं.

'आमच्या पक्षामध्ये सर्वात जास्त महिला आमदार आहेत. भविष्यात तीन ते चार महिलांना मंत्रिपद मिळेल. प्रत्येक वेळेलाच महिलांशी संबंधित मंत्रिपद महिलांना का?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चित्रा वाघ यांच्या या विधानाने मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी मिळणार, हे निश्चित मानलं जात आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?

  • पराभव झाला म्हणून आम्ही खचून जाणार नाहीत

  • कोणी कोणाला पक्षात घ्यावं हे आमचे देवेंद्रजी आणि बावनकुळेजी ठरवतील

  • सगळ्यात जास्त महिला आमदार आमच्याकडे आहेत

  • येणाऱ्या दिवसात पक्षात ३,४ महिलांना मंत्री पद मिळेल

  • प्रत्येक वेळेला महिला कल्याण मंत्रिपद नेहमी महिलांना कशाला हवे

भाजप जगातील एक नंबरचा पक्ष

  • भाजप देशातील नाही तर जगातील एक नंबर पार्टी आहे

  • अंधेरी पोटनिवडणूक बघितली तिथे आमचे मुरजी पटेल आहेत तिथे आम्ही फॉर्म मागे घेतला निवडणूक बिनविरोध केली

  • चिंचवड, कसबा बिनविरोध नाहीच झाली तर आम्ही लढूच

  • पंकजा मुंडे अजिबात नाराज नाहीत आज त्या पाटोदा या ठिकाणी आहेत यामुळे त्या आज आल्या नाहीत

  • देशात नाही जगात कशाप्रकारे भारताचा मान वाढला आहे, तो फक्त मोदीजींमुळे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने