"इंद्रसुद्धा स्वर्गातून खाली येतात तुम्ही तर.." कंगणाने साधला ठाकरेंवर निशाणा

मुंबई: निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे.एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड करत बाहेर पडले आणि भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केले.त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सत्तासंघर्ष आणि पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव यांचा वाद निवडणुक आयोगात गेला होता अनेक दिवस निकालाच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी अखेर आयोगाने निकाल दिला आहे.त्यानंतर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यातच अभिनेत्री कंगना राणावतने देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कंगना राणावत आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगनाचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि कंगनाचा वाद चांगलाच रंगला होता. आयोगाच्या निकाला नंतर कंगनाने एक ट्विट केलं आहे.त्यात तिने लिहिले आहे की "वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार.एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही"

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने