बुडत्या काँग्रेसला उभारी देण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांची नवी घोषणा

दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष, नेते आणि कार्यकर्ते सर्वजण अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी भरत जोडो यात्रा पूर्ण केली. अशातच आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नवी घोषणा देत काँग्रेसला उभारी देण्याचा प्रेतं केला आहे.'सेवा, संघर्ष और बलिदान.. संबसे पहिले हिंदुस्थान' म्हणत काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न खर्गे यांनी केला आहे.'सेवा, संघर्ष और बलिदान.. संबसे पहिले हिंदुस्थान' म्हणत काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न खर्गे यांनी केला आहे. त्यासाठी ही नवी घोषणा देण्यात आली आहे. 'सेवा, संघर्ष और बलिदान.. संबसे पहिले हिंदुस्थान' या एका ओळीमद्धे काँग्रेसचा नवा संकल्प दिसून येत आहे.रायपूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दुसऱ्या दिवशीच्या भाषणाला सुरवात करताना काँग्रेसचा जो पुढचा नारा दिला आहे. 'सेवा, संघर्ष और बलिदान.. संबसे पहिले हिंदुस्थान' या घोषणेने काँग्रेस आता पुढच्या काळात आपला प्रवास करणार आहे. तर येणाऱ्या 2024च्या निवडणुकीसाठी तयारी करणार आहे.यावरून दिसून येते की काँग्रेसचा इतिहास आणि गांधी कुटुंबाचा इतिहास स्वातंत्र्यासाठी दिलेलं बलिदान आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेलं बलिदान आहे. तो सर्व इतिहास परत घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस लोकांपुढे जाणार आहे. त्याचबरोबर 2024 ला सामोरं जाणार आहे. काँग्रेसचे सर्व नेते एकजुटीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने