दूध प्या; दारूच्या दुकानांसमोर गायी बांधून भाजपा नेत्याचं अनोखं आंदोलन

 मध्य प्रदेश: भाजपा नेत्या उमा भारती यांनी दारुच्या दुकानांसमोर अनोखं आंदोलन केलं आहे. दूध प्या असं आवाहन करत त्यांनी दारुच्या दुकानांसमोर गायी बांधल्या आहेत. तसंच या दुकानांसमोर त्या 'दारु नको दूध प्या' अशा घोषणाही देत आहे.मध्य प्रदेशातल्या ओरछा इथं हे आंदोलन होत आहेत. दुकानांच्या समोर उभं राहून उमा भारती यांनी 'दारू नको, दूध प्या' अशा घोषणा दिल्या. गेल्या वर्षी जूनमध्ये उमा भारती यांनी दारुच्या दुकानावर शेण फेकलं होतं.उमा भारती या सध्या दारुविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं करत आहेत. त्यांनी दारुबद्दलच्या धोरणामध्ये काही बदलही सुचवले आहेत. राज्याच्या धोरणामध्ये दारूचं व्यसन सोडवण्यावर जास्तीत जास्त भर दिला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.गेल्या महिन्यामध्ये उमा भारती भोपाळच्या मंदिरात गेल्या होत्या आणि जोवर दारूबद्दलचं धोरण जाहीर होत नाही, तोवर आपण या मंदिरातच राहणार असल्याची घोषणा उमा भारती यांनी केली आहे. गायींसोबतचं आंदोलन ज्या दुकानात झालं, ते दुकान या मंदिराच्या समोरच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने