मोठी बातमी! NCP नेते हसन मुश्रीफ पुन्हा अडचणीत; तीन माजी संचालकांची ED कडून चौकशी सुरू

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुश्रीफांच्या मुलांच्या अटकपूर्व जामिनाला ईडीनं विरोध केलाय.नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीनं लेखी उत्तर सादर करत जामिनाला विरोध केला. अटकपूर्व जामीन दिल्यास तपासावर परिणाम होईल, असा युक्तिवाद ईडीनं न्यायालयात केला.दरम्यान, आता ईडीकडून पुन्हा जिल्हा बँकेच्या तीन माजी संचालकांकडं चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मागच्या 15 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेसह  मुश्रीफांचा हमिदवाडा इथं असणारा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर छापेमारी करण्यात आली होती.आता मुश्रीफांच्या जवळ असलेल्या तीन माजी संचालकांची चौकशी सुरू आहे. पुढच्या काळात इतरही माजी संचालकांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. आप्पासाहेब नलावडे कारखान्याला  कर्जवाटप प्रकरणी ही चौकशी होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं हसन मुश्रीफांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने