अजब पोस्टर भन्नाट विषय.. 'वाळवी' नंतर परेश मोकाशीचा पुढचा सिनेमा

मुंबई: परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' हा मराठी सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. सुरुवातीला सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर वाळवी सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला.वाळवी पाहण्यासाठी थिएटर मध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. वाळवी नंतर परेश मोकाशी यांच्या पुढच्या सिनेमाची सुद्धा उत्कंठा शिगेला आहे. आत्मपॅम्फ्लेट असं या सिनेमाचं अजब नाव आहे.आत्मपॅम्फ्लेट या सिनेमाचं नाव वेगळंच आहे. सिनेमाचं पोस्टर आऊट झालंय. या पोस्टरमध्ये एका तरुण मुलाने त्याच्या तोंडावर फेस लावला असून तो त्याचं तोंड कापण्याच्या तयारीत आहे. परेश मोकाशी यांनी हा सिनेमा लिहिला आहे.'आत्मपॅम्फ्लेट' या चित्रपटाची 'जनरेशन १४ प्लस' स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याचा प्रीमियर ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे.इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 'आत्मपॅम्फ्लेट' चा प्रीमियर शो हाऊसफुल्ल झाला होता. काल म्हणजेच २२ तारखेला सिनेमाचं स्क्रीनिंग करण्यात आलंय. परेश मोकाशी यांनी या सिनेमाच्या लेखनाची जबाबदारी घेतली असून आशिष बेंडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.हा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज कधी होणार याविषयी निश्चित माहिती समोर आली नाही. पण लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान वाळवी आता घरबसल्या पाहता येणार आहे. वाळवी २४ फेब्रुवारीला झी ५ वर प्रीमियर होतोय.त्यामुळे २४ फेब्रुवारीपासून वाळवी घरबसल्या प्रेक्षकांना OTT वर पाहायला मिळणार आहे.त्यामुळे ज्यांचा वाळवी थिएटरमध्ये पाहायचा राहिला त्यांना वाळवी २४ फेब्रुवारीपासून झी ५ वर पाहायला मिळणार आहे.झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी 'वाळवी'ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत.स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने