केजरीवाल, भगवंत मान अन् ठाकरेंच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. देशात कमी वेळात राजकारणात स्थान भक्कम करणाऱ्या आप पक्षातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. आप आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.ठाकरे आणि केजरीवाल यांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, 'बऱ्यात ठिकाणी चर्चा चालू आहे. मध्यांतरी तेलगंणाचे मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केली होती. आता केजरीवाल करत आहे. माझी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, सर्व राज्यांचे मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे'.'आता सर्व राजकीय पक्षांना जाणीव होत आहे, शासनाचा राजकीय पक्षात हस्तक्षेप वाढलेला आहे. शिवसेनेचा जो निर्णय आला, त्यांच्यातून हे दिसतं आहे. सुप्रीम कोर्टाने जसं म्हटलं की निवडणूक आयोगाने निकालावर आम्ही आता काही करणार नाही. मला वाटतं संविधानाला हे धरून नाही', असंही ते म्हणाले आहेत.केजरीवाल आणि मान हे दोघेही एक दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. ठाकरेंच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मातोश्रीवर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतली.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, उद्धव ठाकरे हे वाघाचा मुलगा आहेत. ते ही लढाई जिंकणारच. याशिवाय शिवसेनेची सुप्रीम कोर्टातील लढाई ठाकरेच जिंकतील, असंही केजरीवाल म्हणाले.'उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. या नात्याला आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि वरचेवर भेटू' असं म्हणून अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे आणि आपच्या नव्या नात्याचं सूतोवाच केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने