शिंदे सरकारचं काय होणार? उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; महत्वाची माहिती आली समोर

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यामध्ये शिवसेना कोणाची यावरून वाद सुरु आहेत. यादरम्यान राज्यातील भाजप शिंदे सरकारवर विरोधकांकडून हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप देखील केला जातो.यादरम्यान आता उद्या (१४ फेब्रुवारी)पासून सुप्रीम कोर्टामध्ये नियमित सुनावणी होणार आहे. शिंदे गट आणि शिवसेनेची याचिका ही लिस्ट झाली असून सकाळी १०:३० वाजता सुनावणी होणार आहे.राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. यादरम्यान १४ फेब्रुवारीपासून घटनापिठापुढे सुरू होणार आहे.या घटनापिठातन्यायमुर्ती शहा, न्यायमुर्ती मुरारी, न्यायमुर्ती हिमा कोहली आणि न्यायमुर्ती नार्सिंमा यांचा समावेश आहे. उद्या सुप्रीम कोर्टाच्या सुचीमध्ये या सुनावणीला सकाळी १०.३० वाजता ५०१ क्रमांक देण्यात आला आहे.

महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपसोबत स्थापन केलेलं सरकर हे घटनाबाह्य असल्याचा आरोप केला जातो. यादरम्यान तसेच ठाकरे आणि शिंदे गटात शिवेसना कोणाची यावरून देखील वाद सुरू आहे.दोन्ही गटांकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातो. शिंदे-भाजप सरकार घटनाबाह्या असल्याच्या आरोपानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापिठासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान उद्याच्या सुनावणीत काय निर्णय होतो याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने