भूकंपग्रस्त तुर्कीला भारत करणार मदत; PM मोदींची घोषणा

नवी दिल्ली : तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपात मोठी जीवितहानी झाली आहे. अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून तुर्कीला आवश्यक ती सर्व प्रकारच्या मदतीची घोषणा केली.मोदी म्हणाले, तुर्कीमधील भूकंपग्रस्त नागरिकांना सर्वप्रकारची शक्य ती मदत करण्यास भारत तयार आहे. बंगळुरु येथील इंडिया एनर्जी वीक २०२३मध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली. तत्पूर्वी मोदी म्हणाले, आपण सगळ्यांनी तुर्कीचा विध्वंसक भूकंप पाहिला असेल. यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले आहेत तसेच मोठी वित्तहानी देखील झाली आहे. तुर्कीच्या जवळच्या देशांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले असून नुकसानंही झालं आहे. १४० कोटी भारतीयांकडून या भूकंपातील पीडितांप्रती सद्भावना व्यक्त करतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.दरम्यान, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आज सकाळी बसलेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने मोठा हाहाकार माजला आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात जवळपास ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे तर, हजारो नागरिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात इमारती उद्धस्त झाल्या आहेत. त्यू झाला आणि अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने