'संत-सनातनी एकत्र आले तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही'

प्रयागराज : बागेश्वर धामचे  बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री आज (गुरुवार) सकाळी प्रयागराज इथं दाखल झाले आहेत. इथं सकाळी त्यांनी संगम स्नान केलं.यानंतर त्यांनी खाकचौक व्यवस्था समितीचे सरचिटणीस महामंडलेश्वर संतोष दास यांची भेट घेतली. आज माँ शीतला कृपा महोत्सवात आचार्य धीरेंद्र दुपारी 12 ते 3 या वेळेत दरबार लावून भाविकांच्या समस्यांचं निदान सांगणार आहेत. या दरबारात ते सनातन धर्मासमोरील आव्हानांवर संतांचा सल्ला घेतील.



बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांनी संगम तिरा येथून हिंदू राष्ट्राचा आवाज बुलंद केला. संगमस्नानानंतर त्यांनी संतांची भेट घेतली. महंत दामोदर दास, महंत जयराम दास, महामंडलेश्वर हिटलर बाबा, महंत शशिकांत दास आदी महात्म्यांशी चर्चा करून हिंदू राष्ट्रासाठी प्रत्येक पंथ आणि परंपरेतील संतांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं सांगितलं.संत आणि सनातनी  एकत्र आले तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हिंदू राष्ट्र होऊन सनातन धर्माची महिमा वाढेल, असं ते म्हणाले. 

यावर संतोष दास यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. आचार्य धीरेंद्र यांचं कार्य धर्म आणि राष्ट्रहिताचं आहे. प्रत्येक सनातनींनी संघटित होऊन राष्ट्रहितासाठी कार्य केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार आज मेजा येथील कुंवरपट्टी गावात होणार आहे. माँ शीतला कृपा महोत्सवात आचार्य धीरेंद्र दुपारी 12 ते 3 या वेळेत दरबार लावून भाविकांच्या समस्यांचं निदान सांगणार आहेत. यासोबतच आचार्य धीरेंद्र माघ मेळा परिसरात असलेल्या महामंडलेश्वर संतोष दास सटुआ बाबांच्या दरबाराला भेट देऊ शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने