धक्कादायक! भारताच्या निवडणुकीत इस्रायली कंपनीचा वापर; काँग्रेसची चौकशीची मागणी

नवी दिल्ली:  भारताच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी इस्रायली कंपनीच्या कथित वापराची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने गुरुवारी केली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा आणि सुप्रिया श्रीनेत यांनी इस्रायली युनिट 'टीम जॉर्ज' आणि भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा संदर्भ देत देशातील मतदारांना प्रभावित करण्यासाठी खोटा प्रचार केल्याचा दावा केला आहे.खोट्या 'बातम्या' पसरवल्या जात आहेत. तसेच भारतातील नागरिकांच्या डेटाशीही तडजोड केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 



खेडा यांनी दावा केला की, “भारतातील सत्ताधारी पक्षाकडूनच भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. देशाच्या लोकशाहीवर प्रभाव टाकण्यासाठी इस्रायलच्या एजन्सीची मदत घेतली जात आहे. भारतात बसून ते इतर देशांसोबत भारताच्या लोकशाहीविरुद्ध कट रचत आहेत.सुप्रिया श्रीनेत म्हणल्या की, इस्रायली कंपनी भारतासह ३० देशांच्या निवडणुकांमध्ये फेरफार करते, पण मोदी सरकार गप्प आहे, पेगाससवर मोदी सरकार काहीच बोलले नाही, पसरवण्यात येत असलेल्या खोट्या बातम्यांमध्ये भाजप आयटी सेल आणि त्यांच्या तथाकथित भागीदारांचा हात आहे. यावर सरकारने मौन सोडले पाहिजे, असा दावाही श्रीनित यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने