तुर्कीला ब्लँकेट पाठवलेल्या भारतीयाची चिठ्ठी वाचून दूतावास भावूक

तुर्की: तुर्की आणि सिरियामध्ये मोठा भूकंप झाला आहे. तर आत्तापर्यंत या अपघातामध्ये २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे जीव गेले आहेत. जगभरातून तुर्कीसाठी मदतीचे हात पुढे येत असून अनेकांनी बचाव कार्यासाठी जवान पाठवले आहेत. तर भारतातून एका नागरिकाने तुर्कीमधील निराधार लोकांसाठी १०० ब्लँकेट पाठवले आहेत.कुलदीप, अमरदीप, सुखदेव आणि गौरव असं नाव असणाऱ्या चार जणांनी मिळून तुर्कीतील नागरिकांसाठी १०० ब्लँकेट पाठवून दिले आहेत. तर त्याच्यासोबत एक चिठ्ठी पाठवली आहे. त्यामध्ये एक संदेश लिहिला आहे."भारताकडून प्रेम पाठवत आहोत... दोन दिवसांपूर्वी तुर्कीमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपात अनेक जणांचा जीव गेला त्याचबरोबर मोठं नुकसानही झालं. तुमच्या दु:खात आम्ही सर्व भारतीय सहभागी आहोत. या संकटाविरूद्ध लढण्याचे सामर्थ्य देवो हीच देवाकडे प्रार्थना" असा मजकूर या चिठ्ठीत लिहिला आहे.दरम्यान, तुर्की राजदूत फिरात सुनेल यांनी ही चिठ्ठी आपल्या अधिकृत ट्वीटरवरून शेअर केली असून सध्या या चिठ्ठीची जोरदार चर्चा आहे. तर भारताकडूनही तुर्कीसाठी मोठी मदत देण्यात आली आहे. अनेक देशांकडूनही मोठी मदत तुर्कीसाठी मिळत असल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने