'मला बॉलीवूडमधनं काढलं जाईल...; असं का म्हणाला किंग खान?

मुंबई:   बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खाननं 'पठाण' सिनेमातून जोरदार कमबॅक केलं आहे. 'पठाण' सिनेमा बॉक्सऑफिसवर सुसाट पळत अनेक जुने रेकॉर्ड तोडताना दिसत आहे आणि नवीन रेकॉर्ड कायम करताना. अनेकांना वाटत होतं शाहरुख पुन्हा कमबॅक करुच शकत नाही पण 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून किंग खाननं हे सिद्ध करुन दाखवलं की तोच बॉलीवूडचा 'बादशहा' आहे.'पठाण' भले जोरदार यश मिळवत असला तरी शाहरुखनं नुकतंच त्याच्या ASK Srk सेशल दरम्यान ट्वीटरवर म्हटलं की, ''तो रिटायर नाही होणार तर त्याला बॉलीवूडमधनं काढलं जाईल''.

त्याचं झालं असं की एका नेटकऱ्यानं शाहरुख खानला प्रश्न केला की, 'तुझ्या रिटायरमेंटनंतर बॉलीवूडमध्ये सगळ्यात मोठा स्टार कोण असेल?' अर्थात सर्व नेटकऱ्यांनी शाहरुखला तोच बेस्ट आहे अशी दादही दिली म्हणापण नेटकऱ्याच्या या प्रश्नावर शाहरुखनं नेहमीप्रमाणे आपल्या मिश्किल अंदाजात उत्तर दिलं की, ''मी अभिनयातून कधीट रिटायर होणार नाही..मला काढून टाकलं जाईल..पण हो..कदाचित असंही होऊ शकतं की मी अधिक हॉट बनून परत कमबॅक करेन''. शाहरुखचं हे उत्तर लोकांना भलतंच आवडलं आहे. याला ट्वीटर जवळपास ४ हजार लाइक्स मिळाले आणि ८०० वेळा ते रीट्वीटही केलं आहे.शाहरुख खानच्या एका चाहत्यानं ट्वीट करत लिहिलं की,'मी रोज सकाळी उठून 'पठाण' सिनेमाची त्या दिवशीची कमाई चेक करतो. म ला सवय पडलीय आता. तुमच्या यशात आम्ही आमचा आनंद का शोधतो? काय करु माझ्या या सवयीचं?'यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला,''तुमचे सगळ्यांचे आभार. 'पठाण' सिनेमानं अनेकांना आनंद दिला..मला सगळ्यात जास्त खुशी दिली''.शाहरुख खान,दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम अभिनित 'पठाण' सिनेमानं बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कार्तिक आर्यनचा 'शहजादा' रिलीज झाला तरी 'पठाण' वर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. सिनेमानं रविवारी देखील ५ करोडचा बिझनेस केला. आणि आता लवकरच सिनेमा १००० करोड क्लब मध्ये सामिल होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने