अनिल देशमुखांना आणखी एक दिलासा; PA कुंदन शिंदे यांनाही मिळाला जामीन

मुंबई:  काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर आज पुन्हा अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांचे पीए कुंदन शिंदेंना अटक केली होती. त्यानंतर आज शिंदे यांना मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिंदे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.देशुमखांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत कोर्टाने सीबीआयने दाखल केलेली जामीनाविरोधातील अपील फेटाळून लावले होते.

नोव्हेंबर 2022 मध्ये मुंबईच्या विशेष न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. येथे देशमुखांना जामीन मिळाला होता.मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णया विरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि देशमुखांना जामीन मिळाला. त्यानंतर आता देशमुखांचे पीए शिंदे यांनादेखील जामीन मिळाला आहे.१०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांनी ईडीने अटक केली होती. जवळपास ११ महिने अनिल देशमुख यांनी तुरुंगात काढले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांना १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. नोव्हेंबर २०२१ पासून देशमुख तुरुंगात होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने