भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देश बनवायचाय; उपमुख्यमंत्र्यांचा घणाघाती हल्ला

पाटणा : बीबीसी कार्यालयातील आयकर सर्वेक्षणावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भारताला नथुराम गोडसेचं  राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.असं करून केंद्र सरकारला संदेश द्यायचा आहे की, जो कोणी सरकारविरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. तेजस्वी यादव म्हणाले, 'बीबीसीचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे. गुजरातमध्ये काय झालं हेही सर्वांना माहीत आहे. भाजपला महात्मा गांधींचा  देश नथुराम गोडसेच्या देशात बदलायचा आहे.'भाजप हिंदू राष्ट्राबद्दल बोलतंय, पण आपली विविधता हेच आपलं सौंदर्य आहे, असंही तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी जेडीयू नेते सुनील सिंग यांनी बीबीसी कार्यालयात सुरु असलेल्या कारवाईविरोधात केंद्र सरकारला धारेवर धरलं आणि ही कारवाई सूडाच्या राजकारणाचा भाग असल्याचं म्हटलं.ते म्हणाले, 'बीबीसीवर आयटीच्या छाप्यावरून दिसून येतं की, केंद्र सरकार राजकीय सूडबुद्धीसाठी आयकर, सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे. बीबीसी ही एक प्रेस आहे आणि प्रेस हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ही कारवाई म्हणजे लोकशाहीवर हल्ला असून त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने