कोश्यारींचा राजीनामा मंजूर; महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांबाबत काय म्हणाले CM सोरेन?

दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलाय. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राजीनाम्यावर अखेर मंजुरी देण्यात आलीये. याबाबतची माहिती आज राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली.महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस  यांची नियुक्ती करण्यात आलीये. मागच्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



यासोबतच मुख्यमंत्री सोरेन यांनी राज्याचे (झारखंड) नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं स्वागत करुन अभिनंदन केलंय. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून नव्या राज्यपालांचं स्वागत केलं. सोरेन यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, झारखंडचे नवनियुक्त राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं राज्यातील जनतेतर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा. झारखंडच्या वीर भूमीत आपलं स्वागत आहे, असं त्यांनी म्हटलंय.झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचंही अभिनंदन केलं. सीपी राधाकृष्णन यांचं स्वागत करणाऱ्या ट्विटमध्येच सोरेन पुढं लिहितात, रमेश बैसजी यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा, असंही त्यांनी नमूद केलं.

12 राज्यांचे राज्यपाल बदलले

आज डझनभर राज्यांचे राज्यपाल आणि लडाखचे नायब राज्यपाल बदलण्यात आले. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलीये. त्याचबरोबर तामिळनाडूचे माजी प्रदेश भाजप अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांना झारखंडचे राज्यपाल बनवण्यात आलंय. ते तामिळनाडूतील सर्वात ज्येष्ठ आणि नेत्यांपैकी एक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने