'तुमची कंडिशन काय, बोलता काय?' राहुल-अथियाच्या आहेरावरुन पाकिस्तानी न्युज चॅनेलवर वाद

मुंबई:  बॉलीवूडचा अण्णा सुनील शेट्टीच्या लाडक्या लेकीचं अथियाचं केएल राहुलशी मोठ्या धुमधडाक्यात लग्न झालं. त्याला बॉलीवूडमधील दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित होते. अथिया आणि केएलच्या लग्नाची गेल्या काही वर्षांपासून चर्चा होती. अखेर सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

अथिया आणि केएलला लग्नामध्ये तर सासऱ्यांनी अलिशान गाडी आणि मुंबईमध्ये भला मोठा फ्लॅट दिल्याची चर्चा आहे. तर सलमान खान, जॅकी श्रॉफ, शाहरुख खान यांनी देखील महागड्या भेटवस्तु दिल्याचे फोटो व्हायरल झाले आहे. यासगळ्याची चर्चा आता पाकिस्तानातील न्युज मीडियामध्ये सुरु झाली आहे. वास्तविक गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली असताना त्यांचे लक्ष भारतात काय चालले आहे यावर आहे, यावरुन नेटकऱ्यांनी पाकिस्तानी मीडियाला ट्रोल केले आहे.अथिया आणि केएल राहुलची चर्चा केवळ देशात नाही तर जगभर झाली. दोघांचाही चाहतावर्ग जगभर पसरला आहे. सुनील शेट्टीनं तर लग्नाचे फोटो लग्नाच्या दिवशी व्हायरल होणार नाही याची काळजी घेतली होती. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचेही दिसून आले. सध्या पाकिस्तानमधल्या एका न्युज चॅनेलवर त्यांच्या लग्नाची चर्चा आहे.

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या न्युज चॅनेलचे अँकर अथिया आणि केएल राहुलला लग्नात काय मिळाले यावरुन चर्चा सुरु असल्याचे दिसून आले आहे. त्या दोघांना लग्नात जे गिफ्ट मिळाले त्याच्या किंमतीवर त्यांच्यात चर्चा होते. महिला अँकर म्हणते की, सुनील शेट्टीनं अथियाला मुंबईमध्ये पाच कोटींचे घर भेट दिले. तर सलमान खाननं तर पावणेदोन कोटींची कार लेकीला भेट दिली.तो व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा त्यावर भारतीय नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र भन्नाट आहेत. एकानं तर तुमच्या देशात काय सुरु आहे, तुम्हाला खायला अन्न नाही आणि तुम्ही भारतातील क्रिकेटपटूंच्या लग्नात कुणाला काय मिळाले याची चर्चा करता आहात, धन्य आहे..अशी प्रतिक्रिया दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने