हीच का ती! पूर्वी कशी होती....आता तर; बिग बॉस डोक्यावर घेणाऱ्या अर्चना व्हिडिओ व्हायरल

मुंबई: बिग बॉस सीझन 16 मध्ये सर्वात चर्चेत आलेला स्पर्धक कुणी असेल तर ती आहे अर्चना गौतम. घरात आल्यापासून तिने इतके राडे केले आहेत की तिला विसरुन मुळीच चालणार नाही. तिने आता पर्यंत बिग बॉसच्या घरात सर्वच स्पर्धकांना तिच्या तालावर नाचवलं आहे. तिने शिव ठाकरेचा गळा पकडला आणि बिग बॉसने तिला घराबाहेर काढलं. त्यानंतर ती खरी प्रसिद्धीच्या छोतात आली. ती एकटीच सगळ्याना भिडते.ती प्रेक्षकांच भरभरुन मनोरजंन करते आणि त्याचबरोबर तिच्या गेमवरही फोकस करते. तिच्या वाटेला कुणी आलं तर त्याची काही खैर नसते. घरातील सदस्यही तिच्या नादाला लागत नाही. तिच्यात आणि एम सी स्टॅनमध्ये नेहमीच वाद होतांना दिसतो. असं असल तरी ती घरातल्या सदस्यांची काळजी घेत असते.दरम्यान, अर्चना गौतमचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका शोचं ऑडिशन देताना दिसत आहे. तेव्हाच्या आणि आताच्या अर्चनाला पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही.अर्चना गौतमचा हा व्हिडीओ ९ वर्षापुर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. 'बाजीगर' असं या शोचं नावं आहे. या शोमध्ये जज म्हणून भोजपुरी स्टार आणि राजकारणी रवी किशन, पंकज भदौरिया आणि इतर स्टार्स आहेत. अर्चना गौतम शोमध्ये ऑडिशनसाठी पोहोचताच तिने तिच्या बोलण्याने जजला प्रभावित केले. केवळ रवी किशनला भेटण्यासाठी ती आल्याचं सांगते. येथे अर्चना सांगते की तिने रिअल इस्टेटमध्ये काम केले आहे आणि ती रवी किशनच्या समोर सेल कॉलही करते.

अर्चना गौतमचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. नेटकरी या व्हिडिओला कमेंटही करत आहेत. या व्हिडिओमध्ये अर्चना अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे. तिला पहिल्या नजरेत तुम्ही ओळखूच शकणार नाहीतअर्चना गौतम ने आपल्या करिअरची सुरुवात अनेक टीव्ही आणि प्रिंट जाहिरातींमधून केली होती. याआधी 2014 मध्ये मिस उत्तर प्रदेश जिंकून ती चर्चेत आली होती. 2018 मध्ये तिने मिस बिकिनी इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. यानंतर तिला बिकिनी गर्ल असेही म्हटले गेले. आता ती बिग बॉस 16 मध्ये कमाल दाखवत आहे. ती फायनलच्या जवळ पोहचली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने