Alia Bhatt चे प्रायव्हेट फोटो इमरान हाश्मीच्या घरातून लीक?; काय आहे कनेक्शन..जाणून घ्या

मुंबई: आलिया भट्ट आपला पर्सनल व्हिडीओ लीक झाल्यामुळे सध्या भलतीच रागात आहे. तिचा पती रणबीर कपूर देखील कुटुंबासोबत मिळून तिचा व्हिडीओ लीक केलेल्या न्यूज पोर्टलवर अॅक्शन घेण्याच्या विचारात आहे.यादरम्यान अनेकांना आता हे जाणून घ्यायचं आहे की अखेर फोटोग्राफर्स आलिया घरच्या घरापर्यंत पोहोचले कसे? लोकांना वाटत होतं की फोटो शेजारच्या एखाद्या इमारतीमधून क्लीक केले असावेत.आता काही रिपोर्ट्सनुसार कळत आहे की हे फोटो इमरान हाश्मीच्या घरातून क्लीक केले गेले आहेत.आलिया भट्ट आपल्या घरात बेबी राहासोबत खेळण्यात बिझी होती. तेव्हा ईटाईम्सनं त्यांचे काही फोटो एक्सक्लुसिव्ह वॉटरमार्क सोबत शेअर केले. आलियाला जेव्हा हे कळलं तेव्हा ती भडकली आणि इन्स्टाग्रामवर तिनं न्यूज वेबसाईटची जोरदार प्रतारणा केली.आता चर्चा आहे की हे फोटो इमरान हाश्मीच्या घरातून लीक झाले आहेत. अर्थात या पूर्ण प्रकरणात स्वतः इमरानचा काही दोष नाही. त्याचं झालं असं की इमरानच्या 'सेल्फी' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं त्याच्या घरी मीडियाचे काही लोक गेले होते.आलिया भट्ट आणि इमरान हाश्मीचं घर बान्द्यात आमने सामने आहे. इमरानचे पाहुणे म्हणून गेलेल्या फोटोग्राफर्सनी संधीचा फायदा घेत अशी हरकत केली की आता प्रत्येकजण लोकांच्या प्रायव्हेट लाइफमध्ये मीडिया दखल देते याला नावं ठेवताना दिसत आहे.रणबीर त्यावेळी घरी उपस्थित नव्हता. घरी परतल्यावर त्याला जेव्हा कळलं तेव्हा त्यानं सुरक्षा वाढवली आहे. आता तो विचार करत आहे की त्याला फोटोग्राफर्सवर अॅक्शन घ्यायची आहे की नाही.रणबीर आणि आलियानं फोटोग्राफर्सना याआधीच राहाचा फोटो दाखवला आहे. त्यांनी मीडियाला विनंती देखील केली होती की त्यांनी राहाचा फोटो कुठेही ते सांगेपर्यंत लीक करू नये.तर सोशल मीडियावर आता आलियाची पोस्ट रीपोस्ट करत सेलिब्रिटी देखील मीडियाच्या या चुकीच्या हरकतीवर बोटं ठेवताना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने